लॉकडाऊन मध्येही १२९ चिमुकल्यांपर्यंत विवेकानंद सेवा मंडळाने मदत पोचवली

डोंबिवली/कल्याण: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व देश स्थानबद्धतेत आहे व कल्याण -डोंबिवली-टिटवाळा परिसरामध्ये परिस्थिती वेगळी नाही.

स्वतः घरात राहून रोगप्रसार थांबवायची जबाबदारी आपल्यापैकी प्रत्येकावर आहे. एक कार्यकर्ता / कार्यकर्ती म्हणून आपण ती सजगपणे पार पाडत आहोतच. मात्र त्याचवेळी, ज्यांना रोजच्या घासाची भ्रांत पडली आहे, अशांच्या विचाराने आपलाही घास अडकत असल्याचा अनुभव आपण सर्वच जण घेत आहोत.

रोजंदारीवर काम करणाऱ्यांप्रमाणेच, अनेक निवासी संस्थाही या कारणाने अडचणीत आहेत. अनेक आश्रमशाळा, अनाथाश्रम तसेच अनेक वस्त्यांमध्ये जीवनावश्यक अन्नधान्याचा तुटवडा भासत आहे आणि यांच्यापर्यंत शासकीय मदत पोहोचविणे कधीकधी कठीण होत आहे.

या दरम्यान आपल्याला हाक आली संघ परिवारातील स्वयंसेवकांकडून, की अन्न धान्य, भाजी पाला व काही मेडिकलच्या सामानाची चणचण एक अनाथालय आणि एक आश्रमशाळा अनुभवत आहेत.

ही समस्या सोडवण्यासाठी,
'स्वामी विवेकानंदांच्या सेवातत्वाने प्रेरित होऊन, आपल्या मंडळाने खारीचा वाटा उचलला आहे', हे कळविताना समाधान वाटते.

कोळसेवाडी, कल्याण येथे ७५ अनाथ मुलांच्या शिक्षणाची, त्यांच्या राहण्या-जेवणाची सोय करणाऱ्या नंदादीप फाऊंडेशन या अनाथाश्रमाला तसेच टिटवाळा येथे ५४ बेघर मुलांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या जीवन संवर्धन फाऊंडेशन संचालित आश्रमशाळेला त्यांच्या मागणीनुसार अन्नधान्य, भाजीपाला व मेडिकल सामान याची मदत करून आपल्या मंडळाने सामाजिक कर्तव्य निभवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्या विसेम प्रकल्प क्षेत्रात मदत उपलब्ध करून देण्याचा मंडळाचा मानस आहे.


{{-- --}}